आज बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत आपली बहिण रंगोली सोबत वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आहे. पोलिस स्टेशन ला पोहोचण्यापुर्वी तिने आपला आवाज दाबला जात असल्याचं म्हटलं आहे. वांद्रे न्यायालयाच्या आदेशाने कंगनावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात आज वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये हजर झाली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना ला पोलिस स्टेशन मध्ये आपलं जबाब नोंदवायचा होता. त्यामुळे आज कंगना पोलिस स्टेशन मध्ये हजर झाली.
काय आहे प्रकरण?
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कंगनाने आणि तिच्या बहिणीने अनेक ट्विट केले होते. त्या ट्विट बाबत याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला असून या संदर्भात आज कंगना न्यायालयात दाखल झाली.
मुंबईत राहणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर साहिल सय्यद यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार वांद्रे न्यायालयाने वांद्रे पोलिसांना कंगना विरोधात राजद्रोह, धार्मिक भावना भडकावने आणि समाजात द्वेष निर्माण करणे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कंगनाला समन्स बजावण्यात आलं होतं. या संदर्भात कंगना ने वेळ वाढवून घेत 8 जानेवारीची वेळ मागितली होती. त्यानुसार कंगना आपला जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिसांसमोर हजर झाली आहे.