Rana Ayyub: पत्रकार राणा अय्यूब यांना विमानतळावरच रोखत ED ने दिली समज..
मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या पत्रकार राणाऊब या काल लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या त्या विमानतळावर ती पोहोचल्यानंतर त्यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आले.
मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या पत्रकार राणाऊब या काल लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या त्या विमानतळावर ती पोहोचल्यानंतर त्यांना मुंबई विमानतळावर रोखण्यात आले.
लंडन या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी निघालेल्या पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भारताबाहेर जाण्यापासून रोखले. पत्रकार राणा अय्यूब यांच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेले आहे त्याच आधारावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवलं.
त्यांच्यावर मनीलॉन्ड्रिंगचा आरोप आहे. एक एप्रिल रोजी त्यांना ED कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे यासोबतच त्यांना लूकआउट सर्क्युलर जारी कर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना लंडनला जात असताना विमानतळावरच अडवण्यात आले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावर अडवल्यानंतर या संदर्भातील माहिती ED ला देण्यात आली त्यानंतर काही वेळातच EDची एक टीम विमानतळावर दाखल झाली आणि या टीमने राणा अय्यूब यांची चौकशी करत समन्स नुसार चौकशीला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.