फ्रेंड्स या मालिकेतील हे कलाकार करत होते एकमेकांवर छुपे प्रेम...
17 वर्षानंतर या प्रसिद्ध कलाकारांनी आम्ही दोघेही एकमेकांवर छुपे प्रेम करायचो याची दिलीये कबुली...
फ्रेंड्स या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले जेनिफर अॅनिस्टन आणि डेविड श्विमर हे एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. फ्रेंड्स ही मालिका खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली त्या धर्तीवर मराठीत देखील 'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिका लोकप्रिय झाली होती. फ्रेंड्स या मालिकेतील कलाकारांना त्याच्यातील विनोदी शैलीमुळे चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतले. 90 च्या दशकातील ही मालिका आजही OTT माध्यमांवर लोकप्रिय आहे.
Friends याच मालिकेतील कलाकार Jennifer Anisto आणि David Schwimmer या दोघांमध्ये प्रेमप्रकरण असल्याची चर्चा पुन्हा चालू झाली आहे. याचे कारण असे की, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फ्रेंड्स या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा फ्रेंड्स या मालिकेच्या सेटवरती पुन्हा 17 वर्षनंतर एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आम्ही दोघेही एकमेकांवर छुपे प्रेम करायचो याची कबुली दिली आहे. या दोघांचे सूत पुन्हा जुळले आहेत का? किंवा ते पुन्हा एकत्र येतायत का? आशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.