इरफान पठाण व साफा यांच्या घरी नवा पाहूना...बाळाचे नाव देखील केलं ट्विट..

Update: 2021-12-28 09:08 GMT

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाण दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी सफा बेग यांनी मंगळवारी मुलाला जन्म दिला. याशिवाय इरफान आणि सफाला आणखी एक मुलगा आहे. इरफान पठाणने त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून फोटो शेअर करत लिहिले की, "सफा आणि मी आमच्या बाळाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. मुलगा आणि आई दोघेही चांगले आणि निरोगी आहेत." या फोटोमध्ये इरफानने त्याच्या लहान मुलाला घेतले आहे.

इरफान पठाण आणि सफा बेग यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव इम्रान खान आहे. साफा आणि इरफानची पहिली भेट दुबईत झाल्याचे बोलले जाते. सफाचा जन्म २८ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. ती जेद्दाहमध्ये वाढली आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकली. सफाचे वडील मिर्झा फारुख बेग हे सौदी अरेबियाचे व्यापारी आहेत.

Tags:    

Similar News