राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्राचा अपमान - यशोमती ठाकूर

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, राज्यपालांची भेट घेतली पण कोणत्याही मंत्र्यांची भेट न घेतल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे.;

Update: 2020-10-21 15:00 GMT

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सोमवारी महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना ऐनवेळी भेटण्याची वेळ मागितली पण भेटण्यासाठी आल्याच नसल्याचा प्रकार घडलाय. एवढेच नाही तर आयोगाच्या अध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर कोणत्याही मंत्र्यांची भेटदेखील घेतली नाही. या दौऱ्यात रेखा शर्मा यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ, तसंच राज्यपालांची भेट घेतली, पण कोणत्याही मंत्र्यांची भेट घेतली नाही, त्यामुळे केंद्रीय महिला आयोग फक्त एका पक्षाचा आहे का असा सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.


Tags:    

Similar News