खबर लहरिया वर आधारीत माहितीपटाला ऑस्कर पूरस्कारांमध्ये मिळालं नामांकन

Update: 2022-02-09 01:27 GMT

सध्या सगळीकडे ऑस्कर 2022 पुरस्कार याची चर्चा सुरू आहे. भारतीय चित्रपट नॉमिनेट होईल न होईल परंतु 'Writing with Fire' या माहितीपटाला ऑस्कर 2022 चे पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत नामांकन मिळाले आणि ही भारतासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.

लवकरच 94 वे ऑस्कर पुरस्कार 2022 चा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यापूर्वी ऑस्कर पुरस्कारांच्या अकॅडमी ट्विटर हँडल वरून नामांकन जाहीर केली जातात. अशातच एलिस रॉस लेस्ली जॉर्डन यांनी मंगळवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स च्या ट्विटर हँडल वरून माहितीपटांच्या नामांकनाची घोषणा केली. या माहितीपटाच्या यादीत रायटिंग विथ फायर या माहितीपटाचा देखील समावेश आहे



रिंटू थॉमस आणि सुष्मीत घोष यांनी रायटिंग विथ फायर या माहितीपटाचं दिग्दर्शन केलंय. रायटिंग विथ फायर या माहितीपटात खबर लहरियाच्या उदयाची गोष्ट सांगितली आहे. खबर लहरिया हे भारतातील एक वृत्तपत्र तसंच डिजिटल मीडिया पोर्टल आहे. दलित महिलांनी चालवलेलं भारतातलं हे एकमेव मीडिया पोर्टल आणि वृत्तपत्र आहे. या माहितीपटात दलित महिलांवर भाष्य करण्यात आले आहे. 27 मार्च 2022 ला ऑस्कर विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

Tags:    

Similar News