भारत आणि चीन यांची नेहमीच प्रत्येक गोष्टीत चढाओढ चालू असते.लोकसंख्येच्या बाबतीत चीन नेहमीच भारताच्या पुढे असतो. पण यावर्षी आलेल्या माहितीनुसार भारत आता पहिला क्रमांकावर आहे .
लोकसंखेच्या बाबतीत चिन जरी अग्रेसर असला ,तरी आता भारताने चीनला मागे सारून लोकसंख्येबाबत अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. भारताने चीनला मागे टाकले असून सर्वाधिक लोकसंख्या असणार देश बनला आहे. वर्ल्ड पॉपुलेशन रिव्हू या संस्थेने आकडेवारी जाहीर केली आहे . भारताची लोकसंख्या ही तब्बल 140 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू च्या अंदाजानुसार, 2022 च्या अखेरीस भारताची लोकसंख्या 141.7 कोटी होती. आणि 17 जानेवारी रोजी चीनने घोषित केलेल्या संखेची आकडेवारी 141.2 कोटींपेक्षा कोटी इतकी होती. तब्बल 50 लाखाने भारताची लोकसंख्या वाढली आहे.
भारत लोकसंख्येबाबत पहिल्या क्रमांकावर आला असला तरी बेरोजगारी ,गरिबी हि आणखीन वाढेल कि कमी होईल याचा विचार मात्र करण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे .जितकी लोकसंख्या जास्त तितक्या सोयी सुविधा नाही पुरवल्या गेल्या तर अर्थातच त्या देशात प्रगती खुंटत जाते .ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे ते देश सुखी असताना दिसत आहे .चीनने कुटुंबनियोजन करत लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत .भारतात सुद्धा कुटुंबनियोजनासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत ,पण तरीही आता भारताने चीनला मागे टाकले आहे .