मुंबई: टी 20-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात झालेल्या पहिल्या मॅचचा निकाल पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानं (Duckworth Lewis Rule) लागला. ज्यात भारताचा 18 धावांनी पराभव झाला. मात्र पराभवानंतर सुद्धा भारतीय संघातील हरलीन देओल घेतलेल्या अविश्वसनीय कॅचमुळे भारतीय संघाची चर्चा होतेय.
इंग्लंडचा डाव 19 षटकावर सुरू होता, आणि इंग्लंडची विकेट किपर एमी जोन्सनं (Ami Jones) सिक्स मारण्याच्या उद्देशानं बॉल सीमेच्या दिशेने पाठवला. मात्र बाऊंड्रीच्या जवळ असलेल्या हरलीन देओलनं (Harleen Deol) थरारक कॅच घेतला. बाऊंड्रीच्या जवळ उभा असलेल्या हरलीन देओलनं बॉल सीमेच्या बाहेर जाण्यापासून आधी रोखला आणि कॅच पकडली. पण हातात बॉल असलेल्या हरलीन देओलचा झोक बाऊंड्री लाइनच्या बाहेर गेल्याने, तिने आधी बॉल हवेत फेकला आणि पुन्हा आत येत बॉल कॅच केला.