U-17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची भारताची संधी हुकली

Update: 2022-08-22 14:33 GMT

17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुका एका आठवड्यासाठी पुढे ढकलल्या आहेत. यासोबतच प्रशासकांची समिती रद्द करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान 17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषक भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. त्याच्या यशस्वी होस्टिंगसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तरदायित्व पत्रावर स्वाक्षरी करून आधीच मान्यता दिली होती.पण FIFA ने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली होती, त्यामुळे अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदाचा भारताचा हक्क हिरावून घेतला आहे.

फिफाच्या बंदीमुळे 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणारा आगामी FIFA U-17 महिला विश्वचषक पुढे ढकलला जाणार आहे. जर गरज वाटली तर हे प्रकरण ब्युरो ऑफ कौन्सिलकडे पाठवले जाईल असे फिफाने सांगितले आहे. त्यामुळे आता हि स्पर्धा भारतात होणार नसल्याचेही फिफाने म्हंटले आहे. पण जर भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन घेण्यात येईल असे फिफाने स्पष्ट केले आहे

Similar News