राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. परिणामी नद्यांना पूर आले आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने पुलावरून बस घातली आणि बस वाहून गेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे