संजय राऊत यांनी खासदार नवणीत राणा यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. तसे पुरावे देखील त्यांनी समाजमाध्यमांवर अपलोड केले होते. या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे.
नवणीत राणा यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या आरोप प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. त्यामध्ये नवणीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मात्र नवणीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपये घेतले नाहीत. तर युसूफ लकडावालाने नवणीत राणा यांच्याकडून 80 लाख रुपये घेतले असल्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आल्याचे राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी हेमंत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी नवणीत राणा यांच्यावर एक आरोप केला. त्यामध्ये नवणीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नवणीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपये घेतले नाहीत. राणा यांनी युसूफ लकडावाला याला 80 लाख रुपये दिले असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीवरून हेमंत पाटील यांनी सांगितले.
पुढे हेमंत पाटील म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या एफिडेव्हिटमध्ये त्या व्यक्तीचे क्रिमिनल रेकॉर्ड, त्या व्यक्तीची संपत्ती आणि त्या व्यक्तीने घेतलेले कर्ज या तीन गोष्टी महत्वाच्या असतात. तर त्यापैकी दुसऱ्या रकान्यात नवणीत राणा यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी युसूफ लकडावाला यांना 80 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे. तर ही रक्कम उसणे असू शकतात किंवा कर्जाऊ असू शकतात. त्यामुळे ज्या युसूफ लकडावाला याच्यावर दाऊद गँगशी संबंधीत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या व्यक्तीशी व्यवहार केल्यामुळे हा आरोप नवणीत राणांसाठी अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे, असे राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांनी सांगितले.