व्यसनमुक्तीसाठीअनेक प्रबोधनपर कार्यक्रम घेतले जातात. नरिमन पाँईंट येथे जोडीदार मज निर्व्यसनीच हवा या संदेशाचे घोड्यावर स्वार महाराष्ट्राच्या लेकींनी वरात काढुन व्यसनमुक्तीचा प्रचार केला आहे .
व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे थोड्या वेळाची करमणूक असते. मानवी जिवनाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रेम. मनाचा व शरिराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम. हेच बंध अडीअडचणीत दुःखात आधार ठरतात. व्यसने आधारापोटी कवठाळली जातात परंतु व्यसने ही आधार नाहीत हे समजुन घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार आपणांस ढासळताना दिसत असतो.
व्यसनाधिनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आले होते. वरील संदेश एकाच वेळी देण्याच्या उद्देशाने मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात प्रेम करा मात्र जोडीदार निर्व्यसनीच निवडा हा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरुन देत असल्याची माहिती देत हा व्यसनमुक्तीचा लढा यापुढे अखंडपणे चालु राहील असे सांगत व्यसनमुक्त जीवनच सुखसमृध्द बनवु शकते म्हणुन निर्व्यसनी आयुष्याची कास धरली पाहिजे असे मत मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.
याप्रसंगी नशाबंदी मंडळाने अभिनेते सिध्दार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्निल जोशी, दिलीप प्रभावळकर, देवदत्त नागे, जयवंत भालेकर आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या प्रेमाच्या विचारांचे व्यसनमुक्तीपर प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. ज्यात निर्व्यसनी जोडीदाराच्या आवश्यकतेचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच उपस्थित तरुण तरुणींना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यामध्ये सिध्दार्थ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि 100 मुंबईतील उपस्थित युवकांनी संकल्प केला "मला नको बंगला गाडी, शोधेन मी व्यसनमुक्त गडी" हा संकल्प केला तसेच किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रिचा परवाना रद्द करावा यासाठी महाराष्ट्राच्या लेकी आज जिल्हाधिकारी, समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि राज्य महिला आयोग यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.