ही गायिका जगातील सर्वात श्रीमंत महिला
फोर्ब्स च्या अहवालानुसार ह्या गायिकेची संपत्ती 1.7 अरब डॉलर आहे. इतकी संपत्ती तीने कशी कमवली..वाचा सवीस्तर;
पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी ओळख असलेली रिहाना ही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका बनली आहे. फोर्ब्स नुसार रिहाना यांची एकूण संपत्ती 1.7 अरब डॉलर इतकी असून ती आता जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार बनली आहे. फोर्ब्स च्या यादीत सर्वात श्रीमंत गायिकांच्या यादीत तीच नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ओप्रा विन्फ्रे यांच्यानंतर सर्वात श्रीमंत महिला बनण्याचा मान तिला मिळाला आहे. रिहाना वयाच्या अवघ्या 33 वय वर्षी जगातील सर्वात श्रीमंत महिला काशी बनली?
जगातील सर्वात श्रीमंत महिला काशी बनली?
तर फोर्ब्सच्या अहवालानुसार रिहानाच्या एकूण संपत्ती पैकी म्हणजेच 1.7 अब्ज डॉलर्स पैकी 1.4 अब्ज डॉलर इतकी संपत्ती ही तिच्या 'फेंटी ब्यूटी कॉस्मेटिक्स' या कंपनीतून तिला मिळाली आहे. बरबादोस इथे जन्मलेल्या रिहानाच खरे नाव फेंटी असे आहे. तिने तिच्या नावाने ही कंपनी चालू केली आहे. या कंपनीत तिची 50 टक्के मालकी आहे. तर उरलेली 50 टक्के मालकी ही र्नार्ड अरनॉल्ट यांच्या एलवीएमएच (LVMH) या कंपनीकडे आहे. 2017 साली सुरू झालेल्या या कंपनीने रिहानाला अगदी यशाच्या शिखरावर पोहचवल.
समाजमाध्यमांवर देखील Rihanna चे मिलियन फॉलोअर्स
समाजमाध्यमांवर सुद्धा रिहानाचे फार मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे Rihanna 101 मिलियन तर ट्विटर वर 102.5 मिलियन इतके फॉलोअर्सवर असून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्याचे ती पैसे घेते.