लाल मिरचीच्या दरात वाढ...गृहिणीचे बजेट कोडमडले

लाल मिरचाचे भाव तब्बल १०० रुपयांनी वाढले असून त्याचा फटका आता गृहिणींना बसू लागला आहे.;

Update: 2022-03-23 14:00 GMT

मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची बाजारात विक्रीस दाखल झाली आहे. मात्र या मिरचीच्या दरामध्ये तब्बल 100 रुपयांच्या जवळपास वाढ झाली आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि इतर राज्यात झालेल्या पावसामुळे मिरची उत्पादनात घट झाली त्यामुळे लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. पण याचा परिणाम थेट गृहिणींचे बजेटवर झाला आहे. यापुढे देखील लाल मिरचीच्या भावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येवल्यासह, नाशिक जिल्ह्यात जी लाल मिरची येते ती जास्त करून आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असते. मात्र डिसेंबर महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मिरची उत्पादनात घट झाल्याने 40 टक्केच उत्पादन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 70 ते 80 रुपयांनी काही मिरचीच्या भावात वाढ झाली आहेत. काही वेगवेगळ्या जातीच्या मिरचीच्या दरात शंभर रुपयांच्या जवळपास देखील वाढ झाली आहे. अजूनही यापुढे मिरचीचे भाव वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाल मिरचीचे भाव मागील वर्षी 200 ते 250 रुपये होते. मात्र यावर्षी मिरचीच्या भावांमध्ये 300 ते 350 रुपये पर्यत गेल्याने जवळपास 100 रुपयांनी भाव वाढल्याने गृहिणीना मसाला तयार करण्याकरिता मिरची महागड्या भावाने खरेदी करण्याची वेळ येत असल्यामुळे त्यांचं बजेट कोलमडले आहे.

Tags:    

Similar News