नोकरदार महिलांचा मुंबईत राहण्याचा प्रश्न सुटणार

Update: 2023-02-11 04:55 GMT


मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलां ना कुठे राहायचं हा नेहमी प्रश्न पडतो, मुंबई सारख्या ठिकाणी घर मिळण, नोकरीतून येणाऱ्या पैशातून घराचं भाडं देणं ,या सगळ्या गोष्टींचा विचार करून अनेक मुली आणि महिला सुद्धा मुंबईत नोकरी करण्यासाठी येताना विचार करतात.




 


पण येत्या काळात नोकरदार महिलांसाठी मुंबईत वसतिगृह तयार होणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक परिमंडळात एक अशी सात वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परगावातून आणि परराज्यातून येणाऱ्या महिलांसाठी राहणं सोयीस्कर व्हावं यासाठी वस्तीगृह बांधण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने केला होता.त्यानुसार गोरेगाव मध्ये वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे .त्याचप्रमाणे आता मुंबईत 7 वसतिगृह बांधण्याची तरतूद 2023 -24 च्या अर्थसंकल्पात केली आहे .

त्यामुळे मुंबईत नोकरी साठी येणाऱ्या महिलांचा राहण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे .

Tags:    

Similar News