'मुलीचा हात धरून प्रेमाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही' ; मुंबई पोक्सो न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीचा हात धरून प्रेमाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही असे मत मुंबई पोक्सो न्यायालयाने एका प्रकरणाचा निकाला देतांना व्यक्त केले आहे.;
मुंबई // पोक्सो न्यायालयाकडून लैंगिक छळ प्रकरणी मुंबईत एका तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2017 साली एका अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला प्रेमाची मागणी घालणाऱ्या आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे हात धरून प्रेमाची मागणी घालणे म्हणजे लैंगिक छळ नाही असं मत न्यायालयाने व्यक्त केले.
कोर्टाने दिलेल्या निकालात म्हटलं आहे की, संबधित आरोपीने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्याच्या हेतूने काहीही केलेले नाही, त्यासंदर्भत कोणत्याही प्रकारचे पुरावे कोर्टाला मिळालेले नाही. संबधित तरूणाने लैंगिक छळाच्या हेतूने मुलीचा पाठलाग केलेला नाही किंवा तशी वागणूक केलेली नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्याचबरोबर मुलीवर कोणत्याही प्रकारची बळजबरी संबधित आरोपींने केलेली नाही. म्हणून कोर्टाने संबधित युवकाची निर्दोष मुक्तता केली आहे.