वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे जळीतकांड प्रकरणी आरोपीला न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले होते. तर आज दोषींना शिक्षा सुनावण्यात आली.
3 फेब्रुवारी 2020 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरूणीला भर चौकात जिवंत जाळण्याचा प्रकार घडला होता. तर तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच या घटनेतील आरोपी विकेश नगराळे याला वर्धा न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळे याने शिक्षिकेला जिवंत जाळले होते. त्याप्रकरणी वर्धा जिल्हा न्यायालयाने निर्णय दिला. तर या घटनेतील आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पीडितेच्या वतीने युक्तीवाद करताना सरकारी वकील उज्वल निकम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र आरोपीने युक्तीवाद करताना माझे लग्न झाले आहे. त्यामुळे मला फाशीपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आरोपीने वकीलाच्या माध्यमातून केली होती. तर या प्रकरणात बुधवारी न्यायालयाने हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवले होते. मात्र गुरूवारी न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावताना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या निकालावर आरोपींच्या नातेवाईकांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. पण या निकालाने आमचे समाधान झाले नाही. मात्र हे प्रकरण घडले होते तेव्हा पीडितेच्या आईने सांगितले होते की, या प्रकरणात माझ्या मुलीला ज्याप्रमाणे त्रास दिला. त्याप्रमाणे आरोपीला सर्वांसमोर शिक्षा द्यायला हवी. हे प्रकरण निर्भयासारखे लांबायला नको. मात्र आता या प्रकरणात वर्धा जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे. तर आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
हिंगणघाट प्रकरणानंतर रोडरोमियोंपासून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. मात्र तब्बल दोन वर्षानंतर पीडितेच्या स्मृतीदिनी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.