राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, मद्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
राज्यात काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. मागच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मराठवाड्यात देखील पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर पाऊस काही दिवस उघडला होता. त्यानंतर आता हवामान खात्याने आता मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरावर वादळाचे अभिसरण (सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण झाले असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रवर प्रभाव दिसणार आहे. यामुळे महाराष्ट्रात टप्याटप्याने विदर्भ, मराठवाडा, मद्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच एखादं दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे.