HDFC बँकेने केली एफडीवरील व्याजदरात वाढ; आजपासून होणार लागू..

HDFC बँकेने एक वर्षाच्या FD व्याजदर 5% वरून 5.10% केला आहे. याशिवाय, आता एक वर्ष, एक दिवस ते दोन वर्षांच्या FD वर 5.10% व्याज मिळेल.;

Update: 2022-04-06 11:02 GMT

तुम्हाला आता HDFC बँकेत मुदत ठेव (FD) करून अधिक व्याज मिळेल. बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या एफडीवरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. नवे दर 6 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, HDFC बँकेने त्यांचा एक वर्षाचा FD व्याजदर 5% वरून 5.10% केला आहे. याशिवाय, आता तुम्हाला एक वर्ष, एक दिवस ते दोन वर्षांच्या FD वर 5.10% व्याज मिळेल.


 



पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजात कपात केली आहे. आता 10 लाखांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याजदर 2.75% वरून 2.70% पर्यंत कमी केले आहेत. दुसरीकडे, तुम्हाला 10 लाख ते 500 कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेवर 2.75% वार्षिक व्याज मिळेल. त्यातही ०.०५% कपात करण्यात आली आहे. नवीन दर 4 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत.



Tags:    

Similar News