सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीने भर हायवेवर चालवली गाडी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल होतो आहे. यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे कडेच्या सीटवरती बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते ह्या फॉर्च्यूनर ही गाडी चालवत आहेत. याच कारणावरून त्यांच्या मुलीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Update: 2022-04-18 02:28 GMT

गुणरत्न सदावर्ते हे नाव आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहे. मराठा आरक्षण त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आता नुकतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला या सगळ्यामुळे हे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. सध्या ते साताऱ्याच्या जेलमध्ये आहेत. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना सदावर्ते यांच्या मुलीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये सदावर्ते यांची अल्पवयीन मुलगी ही गाडी चालवत आहे.

जो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते हे कडेच्या सीटवरती बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते ह्या फॉर्च्यूनर ही गाडी चालवत आहेत. या मुलीचं वय 12 ते 15 वर्षाच्या आसपास आहे. स्वतः गुणवंत गुणरत्न सदावर्ते हे आपल्या मुलीचा गाडी चालवत असताना चा व्हिडिओ काढत आहेत. माझी मुलगी झेन ठाणे ते दादर हायवे वर पहिल्यांदा फॉर्च्युनर ही गाडी चालवत आहे असं म्हणत ते झेन चालवत असलेल्या गाडीचा नंबर देखील या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.



नितीन जाधव या ट्विटर वापरकर्त्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की,"आपल्या अल्पवयीन१२वर्षाच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देवुन इतरांचे जीवीतास धोका निर्माण करणार्या गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा-नितीन यादव,बारामती"

बारामती या ठिकाणी राहणाऱ्या या व्यक्तीने हा व्हिडिओ पोस्ट करत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस यांना टॅग करत गुणरत्न सदावर्ते व गाडी मालक जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Tags:    

Similar News