जळगाव जिल्ह्यातील केळी इतर राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे व्हॅगन्स सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जळगावची केळी निर्यातक्षम असल्याने पाकिस्तान आणि बांगलादेशलाही ला निर्यात झाली तर शेतकऱ्यांना कोरोना काळात झालेले नुकसान भरून निघेल. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे रावेर भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी पाकिस्तान ला केळी निर्यात करण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी केली आहे.