"तुझ्या प्रेमाला बंधन नाही माई", Google ने सिंधूताईंना वाहिली मराठीतून श्रध्दांजली!

Update: 2022-01-06 05:50 GMT

'अनाथांची माई' असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचं मंगळवारी 4 जानेवारीला रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. संपूर्ण देशभरातून त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला गेला. गुगल इंडियाने (Google India) सुध्दा मराठीमध्ये ट्विट करत पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचं 4 जानेवारीला रात्री 8.10 मिनिटांनी निधन झालं. 5 जानेवारीला त्यांच्यावर महानूभव पंथानूसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर Google India ने सिंधूताईंच्या आठवणीत ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विट मध्ये म्हटलंय, "तुझ्या प्रेमाला बंधन नाही माई! आशा आणि घर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी तू एक उत्तर होतीस"

सिंधूताई सपकाळ या गेली चाळीस पेक्षा अधिक वर्षे अनाथ मुलांचा सांभाळ करत होत्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची अनाथआश्रम आहेत. त्यांच्या अनाथआश्रमांमध्ये 1500 हून अधिक सर्व वयोगटातील मुलं मुली आहेत. आतापर्यंत त्यांच्या कार्याचा पुरस्कार करणारे 750 हून अधिक पुरस्कार त्यांना जगभरातून मिळाले आहेत. नुकताच भारत सरकाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना राषट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला होता.

Tags:    

Similar News