स्त्रियांना देवीचा दर्जा देण्याचा कावा केवळ त्यांना मुर्खात काढायला आहे : आनंद शितोळे
आपल्याला मिळालेला नेमका ठेवा काय आहे आणि भारतीय राज्यघटनेन आपल्याला किती अमुल्य गोष्ट दिलेली आहे हे लक्षात असुद्या.आनंद शितोळे यांचा महिलांना त्यांचे हक्क जाणवून देईल ,असा हा लेख शेवटपर्यंत वाचा ...;
आपल्याला मिळालेला नेमका ठेवा काय आहे आणि भारतीय राज्यघटनेन आपल्याला किती अमुल्य गोष्ट दिलेली आहे हे लक्षात असुद्या. आनंद शितोळे यांचा महिलांना त्यांचे हक्क जाणवून देईल ,असा हा लेख शेवटपर्यंत वाचा ...
समस्त महिलांना , आपल्याला मिळालेला नेमका ठेवा काय आहे आणि भारतीय राज्यघटनेन आपल्याला किती अमुल्य गोष्ट दिलेली आहे हे लक्षात असुद्या.
अमेरिकन घटना अस्तित्वात आली १७८९ मध्ये.
फ्रेंच राज्यक्रांती नंतर घटना अस्तित्वात आली १७९१ मध्ये.
ब्रिटनची राज्यघटना किमान साडेतीनशे वर्षे जुनी आहे.
अमेरिकन महिलांना मताधिकार मिळाला १९२४ मध्ये.
फ्रेंच महिलांना मताधिकार मिळाला १९४६ मध्ये.
सगळ्यात जुनी लोकशाही असलेली इंग्लंड मध्ये महिलांना मताधिकार मिळाला १९२८ मध्ये.
भारताच्या राज्यघटनेने २६ जानेवारी १९५० ला महिलांना मताधिकार दिला.
घटना समिती आणि पहिल मंत्रिमंडळ दोन्हीमध्ये भारतीय महिला सहभागी होत्या.
१९९३ साली महाराष्ट्र राज्याने महिलांना एक तृतीयांश आरक्षणाचा कायदा केला.
बायानो,
तुम्हाला संविधानाने दिलेले अधिकार महत्वाचे आहेत त्यांची जपणूक तुमच्या हातात आहे.
नोकरी असो किंवा मताधिकार असो किंवा अन्य कुठल्याही बाबीत भारताची राज्यघटना तुम्हाला समान अधिकार देते जे मिळवायला युरोप अमेरिकेत महिलांना संघर्ष करावा लागला.
मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर आपण शिक्षण घेऊन कमवून आपण कमवलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा आणि त्यातून कुठला आनंद घ्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार जितका पुरुषांना आहे तेवढाच तुम्हालाही आहे.
तुमच स्वातंत्र्य हिरावून घेऊन , तुमच माणूसपण नाकारून तुम्हाला काहीही मिळत असेल तरीही त्याची किंमत तुम्ही जे गमावता त्यापेक्षा अतिशय शुल्लक आहे हे लक्षात असू द्या.
म्हणूनच
तुम्ही जर धर्मधारीत देशाची मागणी करत असाल तर पहिली कुऱ्हाड तुमच्या अधिकारांवर चालणार आहे.
स्त्रियांना देवीचा दर्जा देण्याचा कावा केवळ त्यांना मुर्खात काढायला आहे.मखरात बसवून त्यागाची अपेक्षा आहे.
सगळे धर्म पुरुषसत्ताक आहेत हे लक्षात असुद्या. कुणी नरकाच दार म्हणत कुणी ताडन के अधिकारी म्हणत पण बायकांना पायाजवळ ठेवण्याच समर्थन धर्म करतात.
धर्माधारीत देशात तुमची लायकी आणि किंमत फक्त पोर पैदा करणे आणि भाकरी थापणे एवढीच असणार आहे.
निर्णय तुमचा.
तुम्हाला भाकरी थापून पोरवडा सांभाळायचा कि शिक्षण घेऊन स्वतंत्र होऊन आपल जग निर्माण करायचं आहे.
- आनंद शितोळे