कुठल्याही समजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या - डॉ ज्योती मेटे

Give reservation to the Maratha community without disturbing the reservation of any understanding - Dr. Jyoti Mete;

Update: 2024-01-23 06:01 GMT

मराठा आरक्षण हे स्वप्न विनायक मेटे साहेबांचं होतं. महाराष्ट्रा मध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सर्व प्रथम समजा पुढे आणून त्या वरती संपूर्ण महाराष्ट्र भर दौरा केला. त्यानंतर 2014 ला याच प्रश्नावर काम केलं आहे. आणि आरक्षण मिळालं पण ते आरक्षण दुर्देवाने कोर्टात टिकलं नाही. पण आरक्षण ही काळाची गरज आहे त्यासाठी समजतील तरुण,महिला सगळे एकवटले आहेत. कुठल्याही समजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे असे मत स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी मॅक्स वूमन ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केलं.


 



आज मेटे साहेब असते तर चित्र वेगळे असते;

साहेब असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमी रस्त्यावर आणि विधिमंडलात लढाई लढायचे.प्रत्येक मुद्याचा सखोल अभ्यास करायचे.आज मराठा आरक्षण प्रश्नावर मेटे साहेबांची उणीव भासत आहे. पण जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हा लढा चालूच राहणार आहे आणि दुर्देवाने मेटे साहेबांचा लढा अर्धाच राहिला आहे पण तोच लढा मनोज जरांगे पुढे चालवत आहेत.

होय आमच्या संघटनेत फुट पडलीय

आम्ही साहेबांच्या विचरांचा वारसा घेवून पुढे जात आहोत. साहेबांची पत्नी म्हणून मी साहेबांच्या विचारांशी तडजोड न करणार नाही. साहेबांना जावून दीड वर्ष झाली तरी आमची संघटना अभेद्य आहे. जरी माझे दीर आणि भाचा संघटनेतून बाहेर पडून वेगळी संघटना स्थापन करण्याची घोषणा जारी केली असली तरी काही जिल्हे वगळता आमची संघटना अभेद्य आहे आणि राहणार.

Tags:    

Similar News