'कोण म्हणतं कोरोनाने गरिबी वाढली' अदानी, अंबानीच्या संपत्तीत झालेली वाढ बघून तुम्ही पण हेच म्हणाल..
आशियातील दोन सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांसाठी 2021-2022 हे आर्थिक वर्ष अतिशय नेत्रदीपक ठरले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत 69.70% वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 20.67% वाढ झाली आहे.;
पेट्रोलचे, डिझेलचे भाव वाढले, खाद्यते, गॅस सगळ्यांचेच भाव वाढले आता खाऊ काय? आणि जगू कसं? हे सगळे प्रश्न फक्त आपल्या सर्वसामान्यांचे आहेत. या महागाईने अनेकांना प्रश्न पडला आहे की उद्या आपली चूल पेटते की नाही. आता दिवसभर राब-राब राबून जेवणाचे वांदे हे आपल्या सर्वसामान्यांचे जीवन. अहो आपलं जाऊदे, मरू दे! आपल्या वाट्याचं कोण तर कमवत असेल की.. कसं आहे ते आपले अदानी भाऊ आणि मुकेश मामा बक्कळ पैसा कमवू लागले. आता हे महागाईने, कोरोनाने या वर्षभरात तुमची चांगलीच वाट लागली असेल. पण या दोघांना मात्र हे वर्ष लईच गोड गेलंय..कोरोनाने आपले रोजगार गेले, आपलं घर-दार उघडं पडलं पण या दोघांचा नादच करायचा नाही. आपल्या अदानी भाऊंच्या संपत्तीत 69.70% वाढ झाली आणि मुकेश मामांच्या संपत्तीत 20.67% वाढ झाली. आता हे दोघे भांडतायत तू पहिला की मी..पण यात बाजी मारली आहे आपल्या अदानी भाऊंनी. बसं का, बक्कळ पैसा $100 अब्ज पार करतं पटकवलाय पहिला नंबर..हे सगळं ठीक आहे पण आपल्याला कामावर जायचं आहे. नाहीत आपल्या खिश्यात काय 100 रुपयांची मारामार... तू वाच आणि निघ लवकर 12 ते 8..
ही बातमी वाचल्यावर तुमच्या मनात देखील हेच येणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे म्हणून पहिल्यांदाच सांगितलं..
अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
अदानी समूहाचे मालक गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, त्यांची एकूण संपत्ती $100 अब्ज आहे. एवढंच नाही तर ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती $99 अब्ज आहे. आता $1 अब्जाने मागे टाकत अदानी नेट वर्थच्या बाबतीत आशियातील पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. आणि आता ते जगातील दहाव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती बनला आहे. या यादीत इलॉन मस्क अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मुकेश अंबानींचे स्थान मात्र घसरले आहे. ते 11 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अदानी आता सेंटबिलियनर्स क्लबमध्ये सामील झाले आहे. 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तींना सेंट अब्जाधीश म्हणतात.
2021-2022 हे आर्थिक वर्ष या दोन व्यक्तींना अत्यंत चांगले गेले. आशियातील दोन सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांसाठी 2021-2022 हे आर्थिक वर्ष अतिशय नेत्रदीपक ठरले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत 69.70% वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 20.67% वाढ झाली आहे. FY22 मध्ये, अदानीने दररोज सुमारे 756 कोटी रुपये कमावले. अंबानींनी दररोज सुमारे 378 कोटी रुपयांची भर घातली.