काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजप नेत्या इमरती देवी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त शेरेबाजीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काँग्रेससह गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. कमलनाथ यांच्या शेरेबाजीवर आता गांधी कुटुंब गप्प का? असा सवाल त्यांनी विचारला आहे."आता गांधी कुटुंब गप्प का?" स्मृती इराणींचा सवाल
स्मृती इराणी यांनी "कमलनाथ एका महिलेबाबत अशी टिप्पणी कशी काय करु शकतात? कमलनाथ यांनी हे वक्तव्य करुन गांधी कुटुंब गप्प बसलं आहे. त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलण्याऐवजी शांत रहाणं कसं काय निवडलं तेच समजत नाही." अशी टीका केली आहे.