दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे यांची पाच वर्षानंतर होणार तुरूंगातून सुटका...
भ्रष्टाचारासाठी तुरुंगात असलेल्या दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे यांना राष्ट्रपतींच्या माफी अर्ज नंतर त्यांना जेलमधून मुक्त करणार असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. तेथील न्याय मंत्रालयाने शुक्रवारी सुनावणी वेळी सांगितले की, 'पार्क ग्युन यांना क्षमा देण्याचा उद्देश हा कोरोना विषाणू संसर्गाच्या कठीण काळात राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे आहे.' असं म्हंटल आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी पार्क ग्युन-हे यांच्या विरोधात अनेक महिने देशभरात निदर्शने झाली आणि त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांना 2017 मध्ये अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. पार्क ग्युन-हे या दिवंगत राष्ट्राध्यक्ष पार्क चुंग-ही यांची मुलगी आहे आणि त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या.
न्यायालयाने 24 वर्षांची सुनावली होती शिक्षा
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन-हे यांना न्यायालयाने 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती, भ्रष्टाचार आणि घोटाळ्या प्रकरणी त्यांना दोषी ठरविले होते. तसेच त्यांना 18 अब्ज वॉनचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना 2017 मध्ये सत्ता गमवावी लागली होती. 'योनहाप' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, न्यायालयातील सुनावणीचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 16 प्रकरणांमध्ये दोषी ठरवले होते.