गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण; राज्य महिला आयोगाचे कठोर कारवाईचे आदेश

Update: 2022-01-20 08:32 GMT

एका महिलेला मारहाण करतानाचा एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच व त्याच्या पत्नीने मिळून एक गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे.

सातारा तालुक्यातील पळसवडे येथील माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे‌ यामध्ये मारहाण झालेली महिला कर्मचारी या तीन महिन्याच्या गर्भवती असून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे.

या महिलेला ज्या प्रकारे मारण्यात आले ते अमानुष आहे व कालच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली असून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सातारा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई करत आज या आरोपींना अटक करण्यात आले असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. ही गोष्ट निदनिय असून आशा स्वरूपाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिला आयोग कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.



Tags:    

Similar News