देशातील पहिली तृतीयपंथी शासकीय शिक्षिका बनली रिया आवळेकर

Update: 2022-08-03 10:14 GMT

 

first transgender government teacher

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांना देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळाला आहे. मात्र त्यानां ह्या स्थानावर येण्यासाठी जीवनात मोठा संघर्ष करवा लागला. त्यांनी स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आवळेकर असा प्रवास केला. दहा वर्षांनंतर प्रवीणने लहानपनापासून होणारी घुसमट, मनातील खदखद सर्जरी करुन दूर करत देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान मिळवला. त्यामुळे त्याचं प्रशासनाने देखील स्वागत केले यावेळी प्रवीण ने त्याचे मतं माध्यमांसमोर व्यक्त केले.

कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील रहीवाशी होते. लहाणपणा शिक्षणाची आवड असल्याने प्रवीणला योग्य मार्गदर्शन करत त्याच्या काकीने प्राध्यापक अर्थात शिक्षक बनायला सांगितलं. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनला. प्राथमिक शाळेपासून ते डीएडपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने कुडाळ तालुक्यातील पाट गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत झाला.

दरम्यान या यशाबद्दल प्रवीणने आपली प्रतिक्रीया समाजमाध्यंमाना दिली. ते म्हणाला की आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना मनात खदखदत होती. लहान असल्याने घरात सांगू शकत नव्हते. मात्र मनाची कायम घुसमट होत होती. जसजसं वय वाढत जात होत तसतसं आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना अधिक दृढ होत होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आवळेकर असा प्रवास केला. मनात होणारी ही घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत केली. देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज मला अभिमान आहे. यासाठी मला माझं कुटुंब तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य लाभले असल्याचे सांगितले

Tags:    

Similar News