अखेर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी परंतु...

राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने परवानगी देण्यात आली असून ही परवानगी अटी शर्तीसह देण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Update: 2022-04-29 02:29 GMT

राज ठाकरे यांच्या सभेचे 1 मे रोजी औरंगाबाद शहरात आयोजन करण्यात आले होते. यासाठी पोलीस प्रशासनाकडे रितसर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परवानगी मागण्यात आली होती. परंतु या सभेला काही सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनेने विरोध दर्शविला होता. यासाठी सदरील सभेला परवानगी मिळेल किंवा नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आता सभेसाठी पोलीस प्रशासनाने काही अटी, अटी, शर्ती सह परवानगी देण्यात आली आल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने देण्यात आली आहे.

राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी पोलीस प्रशासनाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रितसर परवानगी मागण्यात आली होती. परंतु या सभेला काही सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनेने विरोध दर्शविला होता. यासाठी या सभेला परवानगी मिळेल किंवा नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. सभेला परवानगी मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा घेण्यात आली होती.

आज या सभेला पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने परवानगी देण्यात आली असून सदरील परवानगीही अटी शर्तीसह देण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. आता एक मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे होणार असल्याचे नक्की झाले आहे.

Tags:    

Similar News