मिरची हंगामाच्या सुरुवातीला असलेला सरासरी 6 ते 10 हजार रुपये क्विंटल भाव आता 3 हजार 500 ते 5 हजार 500 पर्यंत आला आहे. तीन महिन्यात 2 ते 3 हजार रुपये भाव घसरला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नंदुरबार मिरची आगार म्हणून प्रसिद्ध आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत मिरची लागवड दोन ते
पण मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरचीचे नुकसान झाले तसेच विविध रोगाच्या प्रादुर्भाव ही वाढला त्यामुळे शेतकऱ्यांनी हिरवी मिरची विक्रीवर लक्ष केंद्रित केले. याचा परिणाम असा झाला की, लाल मिरची बाजारात येण्यास उशीर झाला त्यामुळे आवक कमी राहिल्याने भाव देखील वाढला होता, आता मात्र मिरचीची आवक वाढल्याने भाव काही प्रमाणात घसरले आहेत असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत आजचे भाव जास्तच असल्याचे बाजार समिती चे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले आहे.
सध्या मिरचीला प्रतवारीनुसार किमान 3 हजार ते 5 हजार 500 रुपये क्विंटल भाव मिळत आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात क्विंटलला सहा ते दहा हजार रुपये भाव मिळत होता परंतु जशी आवक वाढली तसा भाव कमी होत गेल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता मिळत असलेला भाव अधिक आहे परंतु अचानक भाव उतरल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.त्याचबरोबर शेतकरी महिला सुद्धा चिंतेत आहेत .
नंदुरबार बाजार समितीत यंदाच्या हंगामात एक लाख क्विंटल मिरची आवक झाली असून हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक लाख दहा हजार क्विंटल मिरची खरेदी झाली आहे. अजून दीड महिना हंगाम सुरू राहणार असून दीड ते पावणेदोन लाख आवक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..