प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांचे निधन, सुप्रिया सुळेंसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली!
मराठी चित्रपटसृष्टी अनेक अभिनेते, अभिनेत्री, साहित्यिक, संगितकार, लेखक आणि कवींनी संपन्न झालेली आहे. यातीलच एक सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार आज सकाळी निधन झालं आहे. ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी हळहळ व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसलं. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि अनेक उर्दू मासिकांमधून त्यांच्या कविता, गझल प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने गझल पोरकी झाल्याची भावना गझलप्रमींमध्ये आहे.
गझलकार इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. मराठी, हिंदी, उर्दू भाषेची दैनिकं, मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2020 च्या जलै महिन्यात ते तोल जाऊन पडल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी त्यांचा सांगलीतील दुधगावमध्ये झाला. १९६४ पासून त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. लिखानात जादू आणि कवितेविषयीच्या जाणीवेमुळे त्यांनी अत्यंत कमी काळात कविता आणि गझलक्षेत्रामध्ये आपले नाव कमावले. पुढे त्यांच्या गझलांना एवढी प्रसिद्धी मिळाली की, सुरेश भट यांच्यानंतर गझलेला समृद्ध करणारी व्यक्ती म्हणून त्यांचे नाव घेतले जाऊ लागले.