श्रीदेवी हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सोन्यासारखं चमकत राहणार नाव आहे. अवघ्या चार वर्षांच्या वयात 'मुरुगा' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी श्रीदेवी हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये चमकली. 1978 मध्ये सोलावा सावण 'Solva Sawan' या हिंदी चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने हिम्मतवाला 'Himmatwala' (1983) या चित्रपटातून यशस्वी झेप घेतली.मिस्टर इंडिया 'Mr.India' (1987), चाँदनी 'Chandni' (1989), नगिना 'Nagina' (1986), चालबाज 'Chaalbaaz' (1989), लमहे 'Lamhe' (1991) यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर श्रीदेवीने केवळ प्रेक्षकांचे मन जिंकले नाहीत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री म्हणून करोडोंचे मानधन घेण्याचा मानही मिळवला आहे. श्रीदेवीचा स्टारडम इतका मोठा होता, की त्या काळातील मोठे मोठे स्टारही तिच्यापासून थरथर कापत होते.
बॉलीवूड जगतात आपला वेगळा ठस्सा उमटवऱ्या श्रीदेवीचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये निधन झाले.
श्रीदेवी जरी आज आपल्यात नसली तरी, तिच्या अभिनयाने आणि तिच्या प्रतिभेने भारतीय चित्रपटसृष्टीवर एक अजून विसरता येणार नाही अशी छाप सोडली आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड आणि कठोर परिश्रम घेणारी श्रीदेवी अनेक चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याची क्षमता ठेवणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. श्रीदेवीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेली श्रीदेवी चित्रपट क्षेत्र तसेच तिच्या चाहत्यानसाठी एक प्रेरणा बनली आहे.
श्रीदेवी हे आयुष्य एक आदर्श आहे. तिची प्रतिभा आणि कठोर परिश्रम आपल्याला नेहमीच आठवत राहतील. ही कहाणी स्वप्न पाहणार्या आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणार्या लोकांसाठी प्रेरणा असणारी श्रीदेवी आजही चमकत्या ताऱ्या सारखी चमकत आहे.