#KetakiChitale ''मला एक व झुबेरला एक न्याय का?'' केतकी चितळेंचा न्यायव्यवस्थेवरच प्रश्न
पत्रकारांनी लिहू नये असं सागणं म्हणजे वकिलांनी युक्तीवाद करु नये असं सांगण्यासारखं आहे. चुक केली तर कारवाई कायद्यानं होईल.
फॅक्टचेकर मोहम्मद झुबेरला (mohammad zubair) जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, त्यांना सर्व FIR प्रकरणे उत्तरप्रदेश पोलिसांची एसआयटी बरखास्त करुन दिल्ली पोलिसांकडे तपास देऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झुबेरची कारागृहात सुटका करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. या निकालानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांनी मला एक न्याय व झुबेर यांना एक न्याय का? असा प्रश्न केला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केतकी चितळे यांना ४० हुन अधिक दिवसांचा तुरुंगावस भेटला होता.
काल 'अल्ट न्यूज'चे (Alt News) सहसंस्थापक मोहम्मद झुबेर (Zubair Mohammad) यांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला यावेळी कलम ३२ अंतर्गत सर्व प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. तसेच मोहम्मद झुबेर यांच्या विरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले. हा निकाल येताच केतकी चितळे यांनी एका वृत्तवाहीवर बोलताना, ''मला एक न्याय व झुबेर याना एक न्याय का?'' असा प्रश्न केला आहे. केतकी चितळे यांच्या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांची पुन्हा एकदा चर्चा आहे.