''बाबांनी निवांत वेळ दिला म्हणून तिचा आनंद माझ्यासाठी समाधानी आणि भावनिक होता'' आमदार योगेश कदम यांची भावनिक पोस्ट

रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी ट्विटरवर 'बाप..लेक' असं म्हणत, अनेक दिवसानंतर वडिलांनी निवांत वेळ दिला म्हणून मुलीला बापासाठी झालेला आनंद काय असतो व मुलीसोबत निवांत काही क्षण घालवण्यास मिळाल्याचा वडिलांना किती आनंद होतो. याविषयी एक पोस्ट शेअर केले आहे.

Update: 2022-03-17 06:56 GMT

 राजकीय पुढारी म्हटलं की, काम करत असताना वेळ, काळ असं कुठलंच बंधन नसतं. आपणच कित्येकदा पाहतो की, एखादा राजकीय नेता आत्ता एखाद्या गावात मिटिंगसाठी आलेला दिसतो तोच काही तासातच तो शंभर किलोमीटर लांब असलेल्या एका प्रचार सभेत भाषण देताना दिसतो. हे संपतं न संपतं तोच तो संध्याकाळी भलत्याच ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसतो. आता राजकीय नेता म्हटलं की, प्रचार सभा, भागातील लोकांच्या गाठीभेटी, कार्यकर्त्यांचे मेळावे आणि या सगळ्यातून वेळ मिळालाचं तर घरी येऊन पुन्हा कार्यकर्ते, लोकांच्या गाठीभेटी हे सगळं आलंच.

मग आपल्याला साधारण प्रश्न पडतो की, अरे मग हे राजकीय पुढारी कुटुंबाला वेळ देतात की नाहीत? बऱ्याच वेळा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देणं शक्य होत नाही. मात्र या सगळ्यातून जरा फावला वेळ मिळाला की ते नक्की आपल्या कुटुंबाला वेळ देतात.

रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी ट्विटरवर बाप..लेक असं म्हणत अनेक दिवसानंतर वडिलांनी निवांत वेळ दिला म्हणून मुलीला बापासाठी झालेला आनंद काय असतो व मुलींसोबत निवांत काही क्षण घालवण्यास मिळाल्याचा आनंद काय असतो याविषयी व्यक्त होत एक पोस्ट शेअर केले आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर योगेश कदम आपल्या मुलीला घेऊन मरीन ड्राईव्हवर गेले होते आणि या ठिकाणचा मुली सोबतचा फोटो शेअर करत त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केले आहे.

योगीश कदम यांची पोस्ट काय आहे पाहुयात..

बाप...लेक..!!!!

मतदारसंघाचे नेतृत्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख या नात्याने विविध कामांच्या अनुषंगाने सतत घराच्या बाहेर राहावं लागतं... त्यामुळे घरी राहून स्वतःच्या मुलीला व परिवाराला वेळ देणे काही वेळा शक्य होत नाही. मात्र आज अधिवेशन संपल्यानंतर माझ्या मुलीसोबत मला काही निवांत क्षण घालवण्यास मिळाले. अनेक दिवसांनंतर लाडक्या मुलीची आणि माझी भेट झाली. बाबांनी निवांत वेळ दिला म्हणून तिचा आनंद माझ्यासाठी समाधानी आणि भावनिक होता..

Tags:    

Similar News