एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंची भेट होणार...

Update: 2022-07-17 08:05 GMT

मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतल्या बंडानंतर आता शिवसेनेत उभी फूट पडली आहे.आमदारच नाही तर खासदार सुद्धा बंद करणार असल्याची चर्च आहे. तर अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक पुन्हा शिंदे व ठाकरे एकत्र यावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी केला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करत पुढच्या दोन दिवसात शिंदे व ठाकरे भेटणार असल्याचं म्हंटल आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे कि, येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थी करिता भाजप नेत्यांनी मदत केली याबद्दल धन्यवाद चर्चेच्या ठिकाणची प्रतीक्षा असेल..




 


आता दीपाली सय्यद यांच्या या ट्विट नंतर शिंदे व ठाकरे कधी भेटणार अशी चर्चा सुरु झाली आहे. आता एकनाथ शिंदे व ठाकरे कुठे व कधी बहेणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Tags:    

Similar News