शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण...

Update: 2021-12-28 06:54 GMT

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने आता चिंता वाढली आहे कारण त्या अधिवेशनाला त्या उपस्थित होत्या.

तकोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी म्हंटल आहे की, ' मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी स्वतःचे विलगीकरण केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करत आहे.

मागील काही दिवसात महाराष्ट्रात कोणाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्याच सोबत नवीन आलेल्या ओमीक्रॉन व्हेरियंट रुग्ण देखील वाढत आहेत. विधिमंडळ परिसरात देखील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या

कामकाजात सहभागी होण्यासाठी RTPCR चाचणी करण्यात आलेली होती. या आरटीपीसीआर चाचणीत तब्बल 35 लोकांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Tags:    

Similar News