वर्षा राऊत यांच्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार मधील या मंत्र्याच्या पत्नीला ईडीची नोटीस!

Update: 2021-01-28 07:42 GMT

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रत ईडी प्रचंड सक्रीय रित्या काम करत आहे. आधी राज ठाकरे, शरद पवार यांसारख्या बड्या नेत्यांना लक्ष केल्या नंतर आता ईडीची गाडी ही राज्यातल्या नेत्यांच्या पत्नींकडे वळली आहे. राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांची आता ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ईडी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना विशेष लक्ष करताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात महाविकास आघाडीच्या प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. विषेश म्हणजे ईडीकडून आत्तापर्यंत ज्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यात एकाही भाजप नेत्याचं किंवा त्यांच्या पत्नीचं नाव नाहीये.

या सर्व नेत्यांची चौकशी गेल्या नंतर ईडीनं आता आपल्या चौकशीची गाडी ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्याकडे वळवली आहे. स्वप्नाली यांना ईडीनं आज सकाळी ११:३० वाजता हजर राहाण्यासाठी समन्म बजावला होता. स्वप्नाली यांना त्याचे वडील आणि उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालमत्तेच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अनेक वृत्तवाहिन्यांनी विश्वजीत यांना या नोटीसेबद्दल प्रश्न विचारला, पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. विश्वजीत कदम यांचे सासरे आणि स्वप्नाली यांची ज्यांच्यामुळे ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे, ते त्यांचे वडील अविनाश भोसले हे पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांचे अनेक बड्या लोकांशी घनिष्ट संबंध आहेत.


Tags:    

Similar News