ED चं पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना बोलावणं...

Update: 2021-01-06 11:48 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला 29 डिसेंबरला इडीची नोटीस आल्यानंतर त्यांची 4 जानेवारीला इडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ED ने त्यांना आता पुन्हा एकदा PMC बॅक घोटाळ्या संदर्भात समन्स बजावला आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची 29 डिसेंबरला नोटीस आल्यानंतर त्यांनी 5 जानेवारी पर्यंत वेळ मागवून घेतली होती. मात्र, त्या 4 जानेवारीलाच इडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच प्रकरणी वर्षा राऊत यांना ED ने नोटीस बजावली असून 11 जानेवारीला हजर राहण्यास सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?

PMC बॅकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात त्यांचे निकटवर्तीय प्रकाश राऊत यांनी 12 वर्षापुर्वी 50 लाख रुपये टाकले होते. याबाबत गेल्या काही महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे ED चा पत्रव्यवहार सुरु असल्याचं समजतंय. या पत्रव्यवहारानंतर इडीने त्यांना चौकशी साठी बोलावले होते. त्यानंतर त्या इडीच्या ऑफिसमध्ये हजर झाल्या होत्या.

प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटिस बजावली होती.

Tags:    

Similar News