शहरांचं नामांतर सोडा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी चक्क ड्रॅगन फ्रुटचं नाव देखील बदललंय
त्यामुळं आता गुजरात वासियांना या फळाला ‘कमलम’ म्हणावं लागणार आहे..
'ड्रॅगन' हे फळ तुम्हाला माहीत असेलच... पण गुजरातमध्ये मात्र हे फळ 'ड्रॅगन' नावानं नाही तर 'कमलम' नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी 'ड्रॅगन' फळाचं नाव बदलून 'कमलम' करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
देशात शहरांची रस्त्यांची नावं बदलण्याची मोठी मोहीम सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं काही शहरांची नाव बदलून टाकली. तर महाराष्ट्रातही औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी होत आहे. अशात गुजरात सरकारने आपला मोर्चा फळांच्या नामांतराकडे वळवल्याने त्याची जोरात चर्चा होतेय.
"फळाला ड्रँगन शब्द वापरणं चांगलं नाही. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे, असं सांगण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या नव्या नावाची घोषणा केली.
काय आहे कमलम शब्दाचा अर्थ?
संस्कृत भाषेत 'कमलम'चा अर्थ कमळाचं फूल असा होतो. नुकतंच हे फळ भारतात लोकप्रिय झालंय. अनेक ठिकाणी बाजारात हे फळ सहजगत्या उपलब्धही होतं. उष्णकटीबंधातील हे फळ आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखलं जातंय.