सिलेंडर पुन्हा महागले, काय आहेत नवीन दर..

Update: 2023-03-01 05:17 GMT

मार्चच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच बुधवारपासून घरगुती एलपीजी सिलेंडर (Domestic LPG) महाग झाले आहेत. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या (cylinder price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.




 दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2 हजार 119.50 रुपये असेल, तर घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1 हजार 103 रुपये असेल. वाढलेले दर १ मार्चपासूनच लागू होतील. 8 महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या (cylinder) दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 6 जुलै 2022 रोजी किंमती वाढवण्यात आल्या होत्या.



Tags:    

Similar News