मुक्या प्राण्यांनी लावलेला जिव्हाळा काय असतो? तो या व्हिडिओ मधून पहा... हल्ली माणसं माणुसकी विसरत चालली आहेत. पण जनावर मात्र माणसाला परत माणुसकीत आणतात की काय ?असं या व्हिडिओ मधून दिसतं...हा कुत्रा या टेम्पोच्या मागे का भुंकतोय ?त्याचं कारण काय आहे?
त्या टेम्पोमध्ये एक गाय बांधलेली दिसते हा टेम्पो या गाईला घेऊन विक्रीसाठी चालला आहे. पण तब्बल दोन किलोमीटर या टेम्पोचा पाठलाग करत हा कुत्रा आला आहे. माणसं माणसाला जीव लावतातच पण हे प्राणी प्राण्यांवर सुद्धा प्रेम करतात .या कुत्र्याची भावना किती प्रेमळ आणि हृदयस्पर्शी आहे हे त्याच्या कृतीतूनच दिसत आहे. काहीही करून गाई जवळ जाण्यासाठी याची तगमग सुरू आहे
शेवटी त्यांनी उडी मारून गाई जवळ जाण्याचं धाडस तर दाखवलं आहेच. पण एखाद्या मुक्या प्राण्याची माया कशी असते हे पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा नवल वाटतं... अनेक सिनेमांमध्ये असे व्हिडिओ दाखवले जातात पण आज खऱ्या रूपाने मुक्या जनावरांमधील ही आपुलकी माया आपल्याला पाहायला मिळाली.याबद्दल तुम्हाला काय वाटलं हे नक्की कळवा.