मोदींना महिलांशी हस्तांदोलनाचा शिष्टाचार कळत नाही का? ट्वीटर वर रंगली डिबेट

Update: 2022-05-07 06:40 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोप दौऱ्यावर होते. सुरुवातीला ते जर्मनीला गेले आणि तिथून ते डेन्मार्कला आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेड्रीक्सन यांची भेट घेतली. व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या महिला पंतप्रधानांसोबत बोलतं असतानाचे काही फोटो व व्हिडिओ समोर आले व त्यानंतर ते समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. आता त्याच फोटो व व्हिडीओ वरून सध्या मोठी चर्चा सुद्धा समाजमाध्यमांच्या व्यसपीठावर रंगली आहे.

पहिला जो व्हिडीओ समोर आला त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेटे फ्रेड्रीक्सन यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून नेटकर्यांनी नरेंद्र मोदी यांचा प्रचंड ट्रोल केलं. त्यानंतर ही चर्चा शांत होते न होते तोपर्यंत आता समाजमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान मेटे फ्रेड्रीक्सन यांचा आणखीन एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेटे यांना हस्तांदोनल करताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतकं विशेष आहे? आणि त्यावरून ट्रोल करण्यासारखे काय आहे? तर आता तुम्हीच बघा नेटकऱ्यांनी काय काय म्हंटल आहे..

चेरी संधू (cheri Sandhu) या ट्विटर वापरकर्त्याने एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी आणि मेटे फ्रेड्रीक्सन यांचा हस्तांदोलन करत असलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करा त्यांनी म्हटलं आहे की, "एखाद्या गृहस्थाला महिलेशी हस्तांदोलन कसे करावे हे नेहमीच माहित असते. महिलेचा हात पकडण्याची ही माचो शैली शिष्टाचाराचा अभाव दर्शवते."

चेरी यांनी असं ट्विट केल्यानंतर त्यांच्या या ट्विटला तीनशेहून अधिक रिट्विट्स आल्या आहेत. यामध्ये अनेकांनी चुकीचं असं काहीच नसल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी नरेंद्र मोदींचे जुने काही फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते महिलांना हस्तांदोलन करत आहे. फोटोच्या माध्यमातून ते महिलांना कशाप्रकारे हस्तांदोलन करतात हे दर्शवणारे असे काही फोटो देखील या ठिकाणी शेअर करण्यात आले आहेत.

आता चेरी यांनी जे ट्विट केलं आहे त्या ट्विटवर काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या देखील आपण पाहूयात..

शैलेश राय हे ट्विटर वापरकर्ते चेरी यांना उत्तर देताना म्हणत आहेत की, चेरी, मी तुझा आणि तुझ्या मतांचा आदर करतो. पण हँडशेक हा हात कोरडा असतील, शेक हलका असेल आणि पकड अगदी घट्ट नसेल तर ठीक आहे.

मी SQA प्रमाणित सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहे म्हणून आपल्याला सांगत आहे. ऑल द बेस्ट.

राज सिंग यांनी चेरी यांच्या याच ट्विट खाली रिट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे नीता अंबानी यांच्यासोबत आहेत. नीता अंबानी व त्यांचे पती मुकेश अंबानी दोघेही या फोटोमध्ये दिसत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानी व मुकेश अंबानी यांना हस्तांदोलन करत असलेला हा फोटो आहे.

या फोटोला नरेंद्र मोदी यांच्या हस्तांदोलनावरून ज्यांनी मूळचे ट्विट केला आहे त्या चेरी यांनी सुद्धा कमेंट केले आहे. त्या कमेंट मध्ये त्या म्हणत आहेत की, "ते हात शेक करत नाही आहेत पण त्यांनी नीता अंबानी यांनी जोडलेले हात पकडले आहेत असं म्हणत त्यांनी हसतानाचा एक ईमोजी शेअर केला आहे.

या ट्विट नंतर राज सिंग यांनी आणखीन एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत की, या ठरकीचा आणखीन एक फोटो (One more of this 'Tharaki') असं म्हणत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका महिलेशी बोलत आहेत आणि महिलेशी बोलत असताना त्यांनी त्या महिलेचा हात हातामध्ये पकडला आहे.

हे ट्विट केल्यानंतर त्यांनी खाली आणखीन एक ट्विट करत म्हटले आहे की, गुफापुत्रकडून आणखी काय अपेक्षा करावी.

अशा प्रकारे समाज माध्यमांवर नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत हस्तांदोलन करतानाचे अनेक फोटो आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप वारीनंतर त्यांना आता नेटकऱ्यांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. सुरुवातीला त्यांचा व मेटे फ्रेड्रीक्सन या डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा एकमेकांसोबत बोलत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओला देखील नेटकरांनी अशाच प्रकारे ट्रोल केलं होतं त्यानंतर आता त्या दोघांच्याच या फोटोवरून समाज माध्यमांवर मोठी चर्चा आहे.

Tags:    

Similar News