देशातील पहिली महिला फोटो जर्नलिस्ट कोण होत्या तुम्हाला माहीत आहे का?
अनेक ऐतिहासिक क्षण त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले होते.;
होमाई व्यारावाला या भारतातील पहिल्या महिला फोटो जर्नालिस्ट (India's first woman photojournalist) होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक Photo त्यांच्या कॅमेरात कैद केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्या पूर्वीचे तसेच स्वातंत्र्यानंतरचे देखील अनेक फोटो त्यांनी त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट कॅमेऱ्यात काढले आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे देखील अनेक फोटो त्यांनी काढले होते. त्यांनी 1947 मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा फडकलेल्या भारताच्या तिरंगा झेंड्याचे तसेच भारतातून लॉर्ड माउंटबेटनची परत जातानाचे छायाचित्रे देखील त्यांनी टिपले होते.
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि लालबहादुर शास्त्री यांच्या अंतयात्रेचे देखील ऐतिहासिक फोटोज त्यांनी आपल्या कॅमे-यात कैद केले. याशिवाय महात्मा गांधी, जवाहरलाल नहरू, मोहम्मद अली जिना, इंदिरा गांधी यांच्या कुटुंबियांचे अनेक फोटोज त्यांनी काढले होते. Homai Vyarawalla यांनी जवळपास चाळीस वर्ष फोटोग्राफी केली. त्यांच्या याच कार्याचा गुणगौरव करत 2010 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.