स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगना अरुणा असफ अली कोण होत्या माहीत आहेत का?

स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगना अरुणा असफ अली कोण होत्या माहीत आहेत का?

Update: 2021-08-15 02:45 GMT

अरुणा यांचा जन्म १६ जुलै १९०९ रोजी झाला. उच्चशिक्षित अरुणा यांनी आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करून त्यांच्यापेक्षा पेक्ष्या 23 वर्षांनी मोठ्या असलेल्या आसफ अली यांच्याशी विवाह केला होता. आसफ अली हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मधील प्रमुख सदस्य होते. त्यामुळे विवाहानंतर अरुणा देखील काँग्रेस मध्ये आल्या. आणि खऱ्या अर्थाने येथूनच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कारकिर्दीला सुरुवात झाली. महात्मा गांधी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्या अनेक प्रचार सभा, प्रभातफेर्‍या यांमध्ये सहभागी होत आणि त्याठिकाणी दमदार भाषण देखील देत. 1930 व 1932 साली जी कायदेभंग चळवळ झाली त्यात व वैयक्तिक सत्याग्रह यात त्या सहभागी झाल्या. सहभागी झाल्या म्हणून त्यांना तुरुंगात पण जावे लागले. यावेळी त्यांनी एक निश्चय केला की आता आयुष्याच्या शेवटपर्यंत अंगावर खादीचे कपडे घालायचे नाहीत आणि त्यांनी ते तसाच केले.

त्यानंतर गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची हाक दिली. आणी मग अरुणा यांनी मीठ बनविणे, मिरवणुका काढणे, सभा भरविणे अशी सगळी काम गावोगावी फिरून केली. हे अश्या प्रकारचे काम करतायत म्हंटल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पुन्हा खटला भरला यानंतर त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा त्यांना झाली. गांधी-आयर्विन करारानुसार अनेक राजकीय कैद्यांना सोडून दिले होते पण अरुणा यांना मात्र सोडण्यात आलेच नाही. त्यांची एवढी भीती इंग्रज सरकारने घेतली होती. त्यांना सोडले नाही म्हणून जनतेने प्रखर आंदोलने सुरू केली या आंदोलनामुळे काही दिवसांनी त्यांची सुटका झाली पण 1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करून तिहार जेलमध्ये ठववले व दोन हजार रुपयांचा दंडही सूनवला.

8 ऑगस्ट 1942 ला अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अधिवेशन मुंबईला गवालिया टँक मैदानावर आयोजित केले होते. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू या सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यामूळे सगळेच महत्वाचे राजकीय नेते तुरुंगात होते. आंदोलनाला दिशा देणार कोणीच नव्हतं. सर्वत्र एक राजकीय पोकळी निर्माण झाली. सर्वत्र पोलिसांचा पहारा होता. गवालिया टँक मैदानावर पोलिसांचा कडक पहारा होता. यातूनही पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणा यांनी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकाविला. त्यानंतर सर्वत्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. ऑगस्ट क्रांतिदिनाच्या त्या वीरांगनीच ठरल्या. त्यानंतर त्या भूमिगत राहून कार्यरत राहिल्या.

स्वातंत्र्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर सुद्धा झाल्या. या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले. अश्या या स्वातंत्र्य लढ्यातील योध्याने दिल्ली येथे 29 जुलै 199६ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यू नंतर 1992 मध्ये त्यांना 'पद्मविभूषण' तर 1997 ला भारत सरकारने त्यांना सर्वोच्च असा मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

Tags:    

Similar News