Petrol & Disel Price - डिझेलची सुद्धा शतकी वाटचाल...
सलग तीसर्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. डिझेल सुद्धा शंभर रुपये काढणार की काय? अशी चिंता लोकांमधून आता व्यक्त होत आहे. डिझेलचा आजचा दर 96. 41 रुपये आहे.;
पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. आज सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांचे डिझेलचे दर आज 25 पैशाने वाढले आहेत. पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ झाली आहे. देशात पेट्रोल व डिझेलचे वाढते दर पाहून आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम हा सर्वच घटकांवर होत असतो. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले की आपसूकच इतरही गोष्टींचे दर हे वाढले जातात. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचे सत्र हे सुरूच आहे. डिझेलचे आजचे दर 96.41 रुपये आहे. तर पेट्रोलसाठी प्रति लिटर 107.26 रुपये मुंबई मध्ये नागरिकांना मोजावे लागणार आहेत. डिझेलचे दर सुद्धा शंभर रुपये गाठणार की काय? अशी चर्चा सध्या सर्वसामान्य लोकांमध्ये पाहायला मिळते आहे.