आज भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मतदार संघातील कामानिमित्त त्यांनी या दोघांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे फोटो समाजमाध्यमांवर त्यांनी शेअर केले आहेत. सध्या त्यांच्या या फोटोची समाजमाध्यमांवर चर्चा आहे. नक्की समाजमाध्यमांवर काय चर्चा आहे पाहुयात..
आज आमदार श्वेता महाले यांनी मतदार संघातील कामानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो शेअर करत त्यांनी म्हंटले आहे की, ''चिखली तालुक्यात जून 2021 मध्ये ढगफुटीने प्रचंड हानी होऊनही विदर्भ, मराठवाड्यावर सतत अन्याय करणार्या मविआ सरकारने काहीच मदत केली नाही.परंतु शेतकरीहित जपणारे युती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्र देताच मदतीचे आदेश देण्यात आले. ही असते बांधिलकी आणि जनतेच्या दुःखाची जाणीव! ''
चिखली तालुक्यात जून 2021मध्ये ढगफुटीने प्रचंड हानी होऊनही विदर्भ,मराठवाड्यावर सतत अन्याय करणार्या मविआ सरकारने काहीच मदत केली नाही.परंतु शेतकरीहित जपणारे युती सरकारचे मुख्यमंत्री@mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री@Dev_Fadnavis जी यांना भेटून पत्र देताच मदतीचे आदेश देण्यात आले. pic.twitter.com/DkHWsNurQ6
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 19, 2022
या भेटीचे फोटो त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर त्यावर अनेक कॉमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी श्वेता महाले करत असलेल्या कामांचे कौतुक केलं आहे तर अनेकांनी टीका देखील केली आहे. बेस्ट CM या नावाने असलेल्या ट्विटर वापरकर्त्याने म्हंटले आहे कि, ताई तुमचे काम नक्कीच जनते करता हिताचे असतात आणि ते अगोदर करता
ताई तुमचे काम नक्कीच जनते करता हिताचे असतात आणि ते अगोदर करता
— बेस्ट CM (@VinodWayal12) July 19, 2022
तर काय झाडी काय डोंगार काय हाटिल अशा नावाने असलेल्या ट्विटर वापरकरताने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत म्हंटल आहे की, राज्यद्रोहीच होते ते सरकार
राज्यद्रोहीच होते ते सरकार .
— काय झाडी काय डोंगार काय हाटिल (@chatrapatisiv) July 19, 2022
Gaykar Dnyandeo M. यांनी श्वेता महाले याना उत्तर देत म्हंटल आहे की, Great जोक
Great जोक
— Gaykar Dnyandeo M. (@dmgaykar) July 19, 2022
Shivdip Bijjamwar यांनी सुद्धा श्वेता महाले यांनी शेअर केलेल्या फोटोवर कॉमेंट करत या नवीन सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, शेतकऱ्यांच्या हीताचे सरकार आले आहे आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण निर्णय मार्गी लागतील ताई🙏🙏
शेतकऱ्यांच्या हीताचे सरकार आले आहे आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण निर्णय मार्गी लागतील ताई🙏🙏
— Shivdip Bijjamwar (@ShivdipBijjamw1) July 19, 2022
तर अशा प्रकारची चर्चा श्वेता महाले यांनी शेअर केलेल्या ट्विटवर सुरु आहे. अनेकांनी त्यांचं व या नवीन सरकारच कौतुक केलं आहे तर काही लोकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.