महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये निवड झाल्याची बातमी खोटीचं; पाहा काय आहे प्रकरण?

व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून दीक्षा शिंदे यांच्या निवडी झाल्याच्या बातमीवर नासाने काय ऊत्तर दिले आहे वाचा...

Update: 2021-08-28 04:25 GMT

मागील दोन दिवसांपुर्वी दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदे हीची अमेरिकेतील नासा (NASA ) या अंतराळ संशोधन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली असल्याच्या बातम्या अनेक माध्यमातुन प्रसिद्ध झाल्या होत्या. दीक्षाने 'ब्लॅक होल्स अँड गॉड' हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासाने स्पष्टीकरण दिले असुन दीक्षाला ही फेलोशिप देण्यात आली नसल्याचे त्यांच्याकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.

 दीक्षाने नासाला 2021 मध्ये 'ब्लॅक होल्स अँड गॉड' हा एक संशोधनपर पेपर पाठवला होता. त्यानंतर त्याच आधारावर दिक्षाने आपली अल्पसंख्याक सेवा संस्थेच्या फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलिस्ट म्हणून निवड झाली असल्याचे सांगितले आहे. आणि त्यांना त्यासाठी नासाकडून मानधनही मिळत असल्याचे तिने सांगितले होते. पण काही लोकांनी यावर शंका व्यक्त केली व त्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेने नासाशी ईमेल द्वारे संपर्क साधला व त्यांना जे उत्तर आले त्यात दीक्षा शिंदे हीची नासाच्या कोणत्याही पॅनलवर नियुक्त झाली नसुन तिला मानधन देखील देत नसल्याचे स्पस्ट केले आहे. तसेच तिची निवड थर्ड पार्टीने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या अधारावर देण्यात आल्याचेही नासाने म्हटले आहे.

या पॅनलिस्टची निवड करण्यासाठीची प्रक्रिया ही तिसऱ्या पक्षाकडून होत असते. दीक्षाला चुकीच्या माहितीच्या आधारे निवड करण्यात आली होती. पॅनलिस्टसाठी फक्त अमेरिकेचेच नागरिकच पात्र ठरू शकतात. दीक्षाचा पेपर स्वीकारण्यात आलेला नसून तिच्या अमेरिकेच्या प्रवासाचा खर्चही नासा नसल्याचे ब्राउन यांनी इमेल मध्ये म्हटले आहे. या प्रकरणी आता पुढील तपास नासाच्या महानिरिक्षक कार्यालयाद्वारे करण्यात येणार आहे. 

फेलोशिपसाठी नियम काय आहेत?

नासाच्या मायनॉरिटी इन्स्टीट्यूशन फेलोशिपसाठी केवळ अमेरिकन नागरिकच अर्ज करू शकतात. ज्यांनी विज्ञान, गणित, तंत्रज्ञान अशा विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे आणि १ सप्टेंबरपासून मास्टर्स प्रोग्राममध्ये दाखला घेतला आहे, तेच यासाठी अर्ज करू शकतात.

Tags:    

Similar News