डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू

Update: 2022-05-17 11:37 GMT

बीडच्या माजलगाव येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. या घटनेत प्रसूतीदरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटलमध्ये घडला असून यावेळी संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदना नंतर मृतदेह थेट ठाण्यात नेला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आज सकाळी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सोनाली गायकवाड असे मयत महिलेचे नाव असून प्रसूती कळा जाणवल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्याने अति रक्तस्राव होऊन मातेसह नवजात बालकाचा यात मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी मागणी केल्यानंतर माजलगाव पोलिस ठाण्यात 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News