शौचालयाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह दोन महिलांना बीडच्या अंबाजोगाई शहर पोलिसांनी अटक केली आहे.अंबाजोगाई शहरांतील स्वराती रुग्णालयातील हि घटना आहे . याच रुग्णालयातील अपघात विभागातील शौचालयात 8 दिवसापूर्वी सकाळी सफाई कर्मचारी यांना बकेटमध्ये हे अर्भक सापडले. या बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता..
तपास करताना पोलिसांनी रुग्णालयातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यावरून अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह ईतर दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.यात कुमारी मातेची वैद्यकीय तपासणी होणार आहे.अर्भकाची तपासणी औरंगाबाद येथे डीएनए व वेगवेगळ्या तपासणी केल्यानंतरच उलगडा होईल. अत्याचारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.अत्याचार झाला तेंव्हा पिडीता अल्पवयीन होती, त्यामुळे या प्रकरणात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होणार आहे.